Wednesday, June 6, 2012

श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने


श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने--


१) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.


२) मनो वाक्काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो.


३) श्रीपीठीकापुरम मधे मी प्रतिदिन माध्यान्हकाळी भिक्षा स्वीकरतो.माझे येणे दैव रह्स्य आहे.


४) सतत माझे ध्यान करणारांचे कर्म,ते कितीही जन्म-जन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करुन टाकतो.


५) (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणार्यांना अन्न दिल्यास,मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.


६) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे.माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.


७) तुमचे अंत:करण शुध्द असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.


८) तुम्ही ज्या देवता स्वरूपाची उपासना कराल,ज्या सद्गुरुंची उपासना कराल,ती मलाच प्राप्त होईल.


९) तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते.माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे,तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.


१०) श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही.सकल देवता स्वरूप समस्त शक्तिचे अंश मिळून माझे विराट स्वरूप,अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.


११) श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे.जे महायोगी,महासिध्दपुरुष माझे नित्य ध्यान करतात,ते माझेच अंश आहेत.


१२) तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा,कर्ममार्गाचा बोध करतो.तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो.


                               श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.

Monday, April 23, 2012

श्रीपाद श्रीवल्लभ स्तुती


||श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम् ||
(श्रीपाद श्रीवल्लभ स्तुती)


श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं
वैराग्य दीप्ति परमोज्वलमद्वितीयम् |
मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्र नेत्रं
संसार - ताप - हरणं सततं स्मरामि ||


श्रीपाद वल्लभ गुरोः करकल्पवृक्षं
भक्तेष्ट - दान - निरतं रिपुसंक्षयं वै |
संस्मरणमात्र चिति - जागरणं सुभद्रं
संसार - भीति - शमनं सततं भजामि ||


श्रीपाद वल्लभ गुरोः परमेश्वरस्य
योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य |
श्री पर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं
त्रैलोक्य - पावन - पदाब्जमहं नमामि ||

Friday, April 20, 2012

श्री सिध्दमंगल स्तोत्र

This is very powerful stotra of lord Shripad Shrivallabha .It is given in Shripada Srivallabha Charitramrutam.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत्रातील अतिशय प्रभावशाली असलेले श्री सिध्दमंगल स्तोत्र.
www.shripadshrivallabha.blogspot.com

Tuesday, November 22, 2011

दत्तजयंती उत्सव(श्री क्षेत्र पिठापूर)

श्री क्षेत्र पिठापूर येथे दत्तजयंती उत्सव दिनांक ०४/१२/२०११ ते दिनांक १२/१२/२०११ या कालावधीत संपन्न होत आहे.कार्यक्रमाचे वेळापत्रक पाहण्याकरिता येथे क्लिक करा.

Thursday, August 11, 2011

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती सप्ताह उत्सव


श्रीपाद श्रीवल्लभ जयंती महोत्सव दिनांक २६-०८-२०११(रविवार) ते ०१-०९-२०११(गुरुवार) पिठापुर येथे संपन्न होत आहे.
अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा. 

Friday, May 20, 2011

श्रीपाद श्रीवल्लभ

श्रीपाद श्रीवल्लभांची थोडक्यात ओळख
श्रीपाद श्रीवल्लभ-दत्तात्रेयांचा प्रथम अवतार
नाव-श्रीपाद श्रीवल्लभ
आईचे नाव-सुमती माता
वडिलाचे नाव-अप्पल लक्ष्मीनरसिंहराजा
आजोबा-बापन्नाचार्य
आजी-सौभाग्यवती राजमांबा
भाऊ-श्रीधरराज शर्मा व रामराज शर्मा
बहिण-श्रीविद्याधरी,राधा आणि सुरेखा
वय-३०
भाषा-तेलगू
जन्म-ख्रिस्त शके १३२०,भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी कृष्ण यजुर्वेद शाखा
जन्मठिकाण-पिठापूर(आंध्रप्रदेश)
गोत्र-भारद्वाज
अवतार समाप्ती-कुरवपूर(कर्नाटक) येथे गुप्त झाले.
नामस्मरणाचे मंत्र-दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

Wednesday, January 26, 2011

सिध्दमंगल स्तोत्रम

श्री मदनंत श्रीविभीषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

सवित्रृकाठकचयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

दौ चौपाती देव लक्ष्मी धनस्ख्या बोधित श्रीचरणा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

सुमतीनंदन नरहरिनंदन दत्तदेवप्रभु श्रीपादा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥

पीठिकापुर नित्यविहारा मधुमति दत्ता मंगलरूपा।
जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥